का माहित नाही,
मन कधी कधी उगीचच कोमेजून जातं,
आणि गंध हरवलेल्या फुलासारखं,
मान टाकून एकटंच बसून राहतं.
कोणाची माहित नाही,
पण उगीचंच वाट पाहत राहतं,
कोणी दबक्या पावलांनी येईल,
आणि खो घालून ताजेतवान करील.
बऱ्यापैकी कधी कोणी येतंच नाही,
मग परत त्याच्याकडेच पाहातो,
मनापासून त्याची विनवणी करतो,
थोडं स्वतःच सावरायला बघतो.
आणि मग काय होतं माहीत नाही,
कधी आशेचा एक अंकुर आतून आपोआपच फुलतो,
तर कधी अनपेक्षितपणे, कोणीतरी, काहीतरी,
मनात एक नवी आशा प्रज्वलित करून जातं.
मग एक गार वाऱ्याची झुळक,
हळव्या तप्त मनावर फुंकर घालून,
गारवा देवुन जाते,
तो असल्याची जाणीव करून.
Om Shanti
PS: Many a times we feel depressed and hurt, but without any apparent reason. And we keep wishing for someone to come or something to happen, to fill us with joy. But most of the time no one comes. And as always we keep looking to him for the answers and peace. Then in unexpected and through myriad different ways, he comes and fills our heart with peace; giving proof that he is always there, at a short distance of a heartfelt call.I have experienced this, and hope many of you. If not think about it!
Comments & Discussion
9 COMMENTS
Please login to read members' comments and participate in the discussion.